“महाराष्ट्र लोकसेवा आयोग”(MPSC) हे राज्य सेवा परिक्षाच्या माध्यमातुन वेगवेगळया पदांसाठी उमेदवाराची निवड केली जाते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. या स्पर्धापरिक्षेच्या माध्यमातुन राज्यामध्ये वेगवेगळ्या पदांसाठी उमेदवाराची  नियुक्ती केली जाते. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस-उपनिरीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधीकारी इत्यादी वर्गासाठी गट-अ, गट-ब आणि गट-क या पदांसाठी व सेवांसाठी उमेदवाराची नियुक्ती केली जाते. पण आयोगाने राज्यसेवा मुख्य परिक्षेतील अभ्यासक्रमामध्ये बदल करण्याचे निर्णय केले आहे.  राज्यसेवा मुख्य परिक्षेतील जुने अभ्यासक्रमाप्रमाणे लेखी व तोंडी परीक्षेत ऐकून ९०० गुण देण्यात येेेत होते , आणि नविन अभ्यासक्रमाचे कशा प्रकारे बदल करण्यात आले आहे ते पाहुया.
 
पेपर क्र.             विषय                    गुण
    भाषा पेपर – १ मराठी               ३०० (२५% गुणांसह अर्हताकारी)
 
     भाषा पेपर – २ इंग्रजी              ३००  (२५% गुणांसह अर्हताकारी)
 
पेपर क्र.         विषय                            गुण
 
        निबंध (मराठी किंवा इंग्रजी)           २५०
 
        सामान्य अध्ययन -१                      २५०
 
        सामान्य अध्ययन -२                      २५०
 
        सामान्य अध्ययन -३                      २५०
 
        सामान्य अध्ययन -४                     २५०
 
        वैकल्पित विषय पेपर – १                २५०
 
        वैकल्पित विषय पेपर – २               २५०
 
मुलाखत   २७५
 
एकुण गुण         २०२५ गुण 
 
या नविन अभ्यासक्रमामध्ये २०२५ गुणांनसाठी आयोगामार्फत राज्यसेवा मुख्य परिक्षा घेतली जाणार, आणि विद्यार्थी आयोगाच्या या निर्णयात सहमत होणार कि नाही व अभ्यासक्रमामध्ये कोण-कोणते बदल होणार त्याचा विद्यार्थ्यांना कसे नुकसान होणार व त्यांना अभ्यासक्रमात येणाऱ्या अडचणी असे काही  प्रश्न आपल्या समोर निर्माण होतात. 
 
१) जुना अभ्यासक्रम बदलामध्ये अभ्यास करतांना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी.
 
– राज्यसेवा मुख्य परिक्षामध्ये आयोगाने केलेला बदल हा कशा प्रकारे केलेला आहे हे सांगणे अवघळ आहे, कारण आयोगाने मुख्य परिक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल पुर्णपणे स्पष्ट केले नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
जे विद्यार्थी ४-५ वर्षांपासुन राज्यसेवा परिक्षेचा अभ्यास करत आहेत, त्यांना अभ्यासक्रमाची भीती निर्माण होत आहे व त्यांनी ५ वर्षांपासुन केलेल्या अभ्यासाचे काय होणार? अशा प्रकारच्या अडचनी विद्यार्थी  मित्रांमध्ये तयार होत आहेत.
असे पण काही विद्यार्थी असणार ज्यांचे परिक्षेचे अंतिम वर्ष असणार म्हणजेच त्यांची वयमर्यादा ही अंतिम असेल त्या विद्यार्थ्यांच काय होणार आणि ज्यांचे जुने अभ्यासक्रम पुर्णपणे अभ्यासुन झाले असल्यास त्या विद्यार्थ्यांना हा मोठा झटकाच असल्यासारखा आहे.
आयोगाने ज्या प्रकारचे मुख्यपरिक्षेचे अभ्यासक्रम आपल्यासमोर ठेवले आहे, व त्या परिक्षा लिखीत पध्दतीच्या होणार असे सांगण्यात आले आहे, मग यामध्ये विद्यार्थ्यांना अशी अडचण येणार, कि प्रश्न कशा प्रकारे तपासले जातील, गुण कशा पध्दतीने दिले जाणार ?
असे खुप प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण होत आहे.
 
२) ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा संपत आहे, त्यांच्या अडचणी.
 
– आयोगाने राज्यसेवा मुख्य परिक्षेमध्ये केलेल्या बदलामुळे एक भितीच निर्माण झाली आहे, कि जुन्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना एक निश्चित वयोमर्यादा देण्यात आली होती, व तेव्हा पर्याय प्रकारचे प्रश्न मुख्य परिक्षेत देण्यात येत होते व त्यांना जुन्या अभ्यासक्रमामध्ये मुख्य परिक्षा एक तासाचा पेपर असायचा.
पण आता नविन अभ्यासक्रमामध्ये आयोगाने राज्यसेवा मुख्य परिक्षा ही लिखीत पध्दतीची ठेवण्याचे विद्यार्थ्यांना स्पष्ट केले आहे. मग विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी किती वेळमर्यादा मिळणार व त्यांना ती वेळ पुरेशी होणार कि नाही आणि विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमामध्ये एक नविन अभ्यासाची निती तयार करण्याची गरज पडणार आहे.
त्याचप्रकारे विद्यर्थ्यांच्या परिक्षेबद्दल वयमर्यादा किती ठेवण्यात येणार जर वयमर्यादा जुन्याच पध्दतीची असेल व विद्यार्थ्यांचे शेवटचे वर्ष असणार. तर त्याची या वेळेच्या आत नविन अभ्यासक्रम अभ्यासुन होणार काय?
 
३) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी.
 
– स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज असते, त्याचसोबत त्यांना अभ्यासाची जिद्द निर्माण होण्यासाठी अभ्यासिकेची गरज असते. पण आपल्याला माहीतच आहे कि या सोई ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा काही अंतर मागे असतात, कारण त्यांना वेळोवेळी  न मिळालेले मार्गदर्शन.
काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ठीक असल्यामुळे ते शहरात जाऊन त्यांना स्पर्धापरिक्षेचे मार्गदर्शन व ज्याप्रकारे अभ्यासक्रमामध्ये झालेला बदल त्यांना सहजपणे माहित होतो.
पण असे ग्रामीण भागांतील विद्यार्थी ज्यांना स्पर्धापरीक्षेची आवड असते, पण त्यांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्यांनी आपले अभ्यास ग्रामीण भागातच सुरू करतात आणि त्यांना मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना अभ्यासक्रमाची पुरेसी माहितीसुध्दा मिळु शकत नाही.
आता आयोगाने राज्यसेवा मुख्य परिक्षेचा अभ्यासक्रम नवीन पध्दतीत तयार केला आहे, हा अभ्यासक्रम शहरी भागातील विद्यार्थी मित्रांना लवकर माहित होता, पण एक ग्रामीण भागातील  विद्यार्थी जो स्पर्धा परिक्षेच्या मार्गाने जात आहे. जर त्याला आयोगाच्या या नवीन अभ्यासक्रमाबद्दल वेळेत माहित न झाल्यामुळे त्याच्या अभ्यासक्रमामध्ये अडचणी निर्माण होणारच, आणि तो ग्रामीण भागात राहत असल्यामुळे त्याला मार्गदर्शन पण मिळणार नाही.
अशा काही अभ्यासक्रमाबद्दलच्या अडचणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात.
 
४) अभ्यासक्रम ४ ते ५ वर्षांनंतर लागू केल्यास विद्यार्थ्यांना परिक्षेची तयारी कशा प्रकारे करता येईल.
जो जुना अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी ३-४ वर्षामध्ये केलेला अभ्यास व नवीन अभ्यासक्रम हा मुख्य परिक्षेत लिखित स्वरूपात होण्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या नवीन अभ्यासक्रमाचा अभ्यास करण्यासाठी जर आयोगाने नवीन अभ्यासक्रम ४ ते ५ वर्षांनंतर सुरू केले तर विद्यार्थ्यांचा या पध्दतीने अभ्यास करायला वेळ मिळणार, व त्यांना राज्यसेवेतील मुख्य परिक्षेची लेखी परिक्षेचासुध्दा अभ्यास होणार व ते त्यांना अवघड होणार नाही.
विद्यार्थी जेव्हा लिखित पध्दतीने अभ्यास करतांना जर त्यांना काही अडचणी आल्यास ते सहजपणे त्या अडचणी दुर करू शकतील. आयोगाने जर हे नवीन अभ्यासक्रम पुढील परिक्षेपासुन लागु केले, तर विद्यार्थ्यांवर दु:खाचे डोंगर कोसळणार व या नवीन अभ्यासक्रमाची पुरेसी माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात परिक्षेबद्दलची भीती निर्माण होणार आणि परिक्षा लेखी पध्दतीची असल्यामुळे विद्यार्थ्यांना लिखानाकडे सुध्दा लक्ष देणे गरजेचे असणार आहेत. मुख्य परिक्षा लिखित स्वरूपाची आहे तर विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर कशा स्वरूपाचे मांडायचे याच्याकडे सुध्दा लक्ष ठेवणे आणि ते स्वत:च्या शब्दात कसे लिहायचे ही विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
अशा खुप छोट्या – छोट्या अडचणी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होत आहेत.
 
 
– प्रतिक सुधाकर मोहुर्ले
मूल