welcome to The Vidarbha Gazette


वाढदिवशी बर्थ डे कॅण्डलचा स्फोटात दहा वर्षी बालक गंभीर जखमी

 चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी घेतली दखल  

वाढदिवसाच्या निमित्ताने केकवर लावलेली फवारे उडविणारी मेणबत्ती एक १० वर्षीय बालक हातात पकडून असताना तिचा अचानक स्फोट झाला . त्यात त्या बालकाचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला आहे . ही घटना गुरुवारी सायंकाळी ब्रह्मपुरी शहरात घडली . त्यानंतर बालकाला ब्रह्मपुरी शहरातील आस्था रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने त्या बालकावर प्लास्टिक सर्जरी करून १५० च्या जवळपास टाक्यांची तब्बल पाच तासांची यशस्वी शस्त्रक्रिया केली . चिमूर तालुक्यातील भिसी येथील रहिवासी असलेले विनोद डोंगरे हे आपल्या पत्नी व १० वर्षीय मुलासह मित्राच्या घरी असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते . तेव्हा सायंकाळी ६ वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू झाला . केकवर असलेली फवारे उडवणारी मेणबत्ती पेटविण्यात आली . मेणबत्तीवर फुंकर घालून १० वर्षीय मुलगा आरंभ याने ती मेणबत्ती आपल्या हातात पकडली असता तिचा स्फोट झाला . स्फोटाची भीषणता एवढी होती की , त्यामध्ये आरंभ याचा उजवा गाल पूर्णतः फाटून छिन्नविछिन्न झाला . गालातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला . त्याला ब्रह्मपुरी येथील आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर लगेचच शुक्रवारी त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी करून त्याचा फाटलेला गालाचा भाग आणि जीभ जोडण्यात आली . संबंधित बालक गंभीर अवस्थेत होता , त्याची पूर्णतः जीभसुद्धा फाटली होती . उजवा डोळा २ ते ३ सेमीने वाचला . दोन ते तीन दिवस त्याला बोलता व काहीही खाता येत नव्हते . अशा बिकट परिस्थितीत आम्ही नागपूरवरून प्लास्टिक सर्जन डॉ . श्रीकांत पेरका यांना उपचारासाठी पाचारण केले . उपचारादरम्यान १५० टाके मारावे लागले . ही शस्त्रक्रिया आस्था हॉस्पिटलचे डॉ . पंकज लडके डॉक्टर सुमित जयस्वाल यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
 
चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सदर घटनेची  दखल घेतली असून पुढील कारवई करण्याबाबत आश्वासन ‘विदर्भ गॅझेट’शी बोलताना दिले.

Search

About

The Vidarbha Gazette: An Introduction

Digital media has democratized the production and consumption of media to an extent that would have been unimaginable in the past. Media production is no longer at the mercy of a few family-owned businesses and corporate houses. Roughly speaking, every person who has an android phone in hand and a few bucks to recharge their data pack have the potential to produce news and not just consume it.