आदिवासी हॉस्टेलसाठी श्रमिक एल्गार आणि TDCF च्या संघर्ष
राजुरा येथील आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह अजूनजी सुरू झाले नसल्याने मागील दीड महिन्यापासून शाळा सुरू झाली असतांना आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह सुरू नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
आज चंद्रपूर येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात विद्यार्थ्यांना घेऊन श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष तथा ट्रायबल डेवलोपमेंट कल्चरल फाऊंडेशनचे अध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी प्रकल्प अधिकारी रोहन घुघे यांची भेट घेतली व राजुरा येथील वसतिगृह तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. दरवर्षी दीड दोन महिने वसतीगृह सुरू केल्या जात नाही यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षण वाया जात असल्याने त्यांच्यात कमी पणाची भावना निर्माण होत आहे आणि याला कारणीभूत आदिवासी विकास विभागाचे अधिकारी असून येत्या दोन दिवसात वसतिगृहात प्रवेश न दिल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे मेश्राम यांनी निवेदनातून कळविले आहे.
यावेळी प्रकल्प अधिकारी यांनी वसतिगृहात राहण्याची सोय करणार असल्याची ग्वाही दिली. मात्र शासनाने अजूनही वसतिगृह सुरू करण्याची परवानगी दिली नसल्याचे मत व्यक्त कले.