अत्यल्प उदिष्टामुळें शेतकरी अडचणीत
 
एकीकडे शासन अधिक धान्य उत्पादीत करण्यांसाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देत असतांनाच, दुसरीकडे उत्पादीत धान्य खरेदीसाठी शासनाची नकारघंटा शेतकर्याचा जीवावर उठत आहे. शासनाने आॅनलाईन पध्दतीने मर्यादीत मर्यादित विक्रीची अट असे नवीन नियम पुढे केल्याने उर्वरित धान्याचे काय करायचे असा प्रश्न आता निर्माण झाल्यांने शेतकर्यांनी मर्यादीत धान विक्रीस नकार दिला आहे. यामुळे शासनाचे आदेश येवूनही धान खरेदी थांबलेली आहे.
 
किमान आधारभूत किमंती जाहीर करून, या किमंतीवर धान खरेदीची शासनाची हमी असतांनाही, प्रत्यक्षात मात्र शेतकर्यांनी उत्पादीत केलेले धान खरेदी करण्यांस शासनाची टाळाटाळ शेतकर्यांना कर्जबाजारी करीत आहे.
 
रब्बी हंगामात केंद्र शासनाने महाराष्टाला 11 लाख क्विंटल धान खरेदीचे उदिष्ट महाराष्टासाठी मंजूर केले. चंद्रपूर जिल्हयाला 39,921 क्विंटल धान्य खरेदीचे उदिष्ट मिळाले. जिल्हयात एकूण 21 आधारभूत धान खरेदी केंद्रातून 4843 शेतकर्यांनी आधारभूत धान विक्रीसाठी नांव नोंदणी केली. 4843 शेतकर्यांनी सरासरी दोन एकर धान उत्पादन केले तरी, एकरी 25 क्विंटलप्रमाणे 2,42,150 क्विंटल धानाचे उत्पादन चंद्रपूर जिल्हयात झाल्यांचा अंदाज आहे. त्यापैकी केवळ 39,921 क्विंटल धान शासन खरेदी करणार आहे. उर्वरित 2,02,229 क्विंटल धान कुठे विक्री करायची? असा प्रश्न आता धान उत्पादक शेतकर्यांसमोर पडला आहे. केंद्र सरकारने धान खरेदीचे उद्ष्ट वाढवावे याच मुद्यावरून गोंदियात शेतकर्यांनी आंदोलन सुरू केले आहे तर चंद्रपूर जिल्हयातील आधारभूत धान खरेदी केंद्रानी संभाव्य धोके लक्षात घेवून, शेतकर्यांचा उद्रेक होण्यांची भिती लक्षात घेत, अजूनपर्यंत धान खरेदीला सुरूवात केलेली नाही.
 
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालयातून आता धान खरेदीसाठी खरेदी केंद्राकडे तगादा लावला आहे.
 
आमचे प्रतिनिधींने याबाबत एका धान खरेदी केंद्राचे व्यवस्थापकांशी चर्चा केली असता, एका सातबार्यावर 8 क्विंटल धान खरेदी करावी लागणार आहे. शेतकर्यांकडे अधिकचे धान असल्यांने शेतकरी, पूर्ण धान खरेदी करण्यांचा आग्रह करीत आहे, त्यामुळे धान खरेदीत अडचण निर्माण होत असल्यांचे सांगीतले.
 
चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांचेशी संपर्क केला असता, त्यांनीही धान खरेदीत होत असलेली अडचण मान्य केली. राज्य व केंद्र शासनाने धान खरेदीचे उदिष्ट वाढवून दिले तरच हा प्रश्न सुटू शकतो असे मत व्यक्त केले. जिल्हयात धान खरेदीचे उदिष्ट वाढवून देण्यात यावे यासाठी प्रस्ताव पाठविले असल्यांचे त्यांनी आमचे प्रतिनिधीस सांगीतले.
 
रब्बी हंगामाचे धान खरेदीवरून, बाजूच्याच जिल्हयात आंदोलन होत आहे, मात्र चंद्रपूर जिल्हयातील लोकप्रतिनिधी धान उत्पादकाच्या प्रश्नावर थंड असल्यांचे दिसून येत असल्यांने रब्बीत धान उत्पादन करून, आपले उत्पन्न वाढवू इच्छिणार्या 4843 शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत.