“वनवासी कोणची जात आहे?” – आम. आमश्या पाडवी यांच्या खडा सवाल 
 

 

 

विधान परिषद
…………….
आमदार आमश्या पाडवी
यांचा प्रश्न व
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे उत्तर .
मंत्र्यांच्या उत्तरानंतर आमदार पाडवी पुन्हा बोलण्यास उभे झाले तेव्हा अन्य आमदार कसे डिस्टर्ब करत होते ते काळजी पूर्वक ऐका.
 
 
 
आमदार, मंत्र्याचा संवाद >
आमश्या फुलजी पाडवी: माझं प्रश्न मंत्री साहेबांना आहे.वनवासी कोण ?
वनवासी म्हणून जो शब्द आहे.आदिवासी अन वनवासी.वनवासी हा कोणची जात आहे! याच उत्तर द्या मला आज.वनवासी कायम आम्हाला वनवासी आदिवासी वनवासी. म्हणजे वनवासी कोणची जात आहे.वनवासीची जात कोणची.हे मला पाहिजे. आज पाहिजे.
 
सुधीर मुनगंटीवार, मंत्री:महोदया, वनवासी याचा अर्थ आम्ही जे वनात राहतो. वनक्षेत्रात राहणारे वनवासी. आणि शेड्यूल ट्राइब मध्ये येणारे हे आपण साधारणतः आदिवासी म्हणतो. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनात फक्त आदिवासी समाजच राहतो असे नाही.इतर समाजाचे जे लोक राहतात ते आपल्याला वनात राहणा-या गावामध्ये वनवासी म्हणतात.
 
आमदार पाडवी:म्हणून माझं मंत्री महोदय हा प्रश्न…..(अन्य सदस्य पाडवीला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात असे दिसते.अन्य सदस्याचा आवाज स्पष्ट येत नाही.पण आमदार पाडवी ला बसा म्हणतात असे पाडवीच्या बाॅडी लँग्वेज व बोलण्यातून दिसते)….(ते पुढे बोलता). हा ठिक आहे.वनवासी किती वर्ष चालणार आहे.आम्ही वनामधे राहतो म्हणजे जनावर आहे का ?आम्ही माणसं नाही का ?हा शब्द मागे घ्या!वनवासी म्हणजे काय ?
 
एवढीच क्लिप आहे.या वरून असे दिसते की,चर्चेमध्ये वनमंत्री यांनी वनवासी शब्द वापरला असेल. आणि नेमक “वनवासी ” या शब्दाला आमदार आमश्या पाडवी यांचा आक्षेप आहे.पाडवीचा आक्षेप शंभर टक्के बरोबर आहे.मंत्री महोदयाने उत्तर चातुर्याने दिशाभूल करणारे.
 
‘वनक्षेत्रात राहणारे वनवासी’.. हा वाक्य प्रयोग तसा बरोबर आहे. पण ‘वनात राहणारे ‘मंत्री म्हणतात तसे ना आदिवासी ,ना अन्य लोक स्वतःला वनवासी म्हणवून घेत नाही.तसे प्रचलन, प्रघात ही नाही.संशोधक, अभ्यासक यांनी माहिती घ्यावी असे काही आहे का!
 
महाराष्ट्र किंवा देशातील कोणताही आदिवासी स्वतःला वनवासी म्हणवून घेत नाही.आणि अन्य जातीचे लोकही स्वतःला ‘वनवासी ‘म्हणवून घेत नाही. प्रचलना प्रमाणे ते ज्या जात समुहाचे आहेत तसे सांगतात.दुसरे शेड्यूल ट्राइब म्हणजे साधारणतः आदिवासी असे मंत्री म्हणतात ते बरोबर. पण संविधाना मध्ये आदिवासी ना शेड्यूल ट्राइब्स च म्हटले आहे.त्यामुळे साधारणतः शब्दाची गरज नाही.
 
आता ‘वनवासी ‘ हा शब्द कोण प्रचलित करत आहे.तर त्याच उत्तर उघडच आहे आरएसएस! आरएसएस ने जशा अनेक संघटना उभ्या केल्या. जसे राजकीय संघटन- पक्ष जनसंघ,हा जनसंघ आणीबाणीत १९७६-७७ जनता पक्षात विलीन केला होता. १९८० मध्ये जनता पक्षातून बाहेर पडून नव्या रूपात, नव्या नावासह-भाजपा म्हणून रूजू झाले. अभाविप,रा.से.स.बजरंग दल अशा अनेक उपशाखा निर्माण केल्या. त्यामधील एक शाखा म्हणजे-आदिवासी मध्ये काम करणारी “वनवासी कल्याण आश्रम ”
 
या वनवासी कल्याण आश्रमची स्थापना १९५२ मधली. या मध्ये फक्त आणि फक्त आदिवासीच समुहाचे लोक आहेत.या वनवासी कल्याण आश्रम चे अनेक ठिकाणी ” एकलव्य वनवासी छात्रावास ” म्हणजे आदिवासी मुलांसाठी होस्टेल आहे.लक्ष्यच आहे आदिवासी कन्व्हर्टटेड इन टू वनवासी.आदिवासी शब्दाच प्रचलन कमी कसे होईल असा सातत्याने प्रयत्न. आता मंत्री महोदय आरेसेस च्या मूशीतून तयार झाले त्यामुळे त्यांच्या मुखी “वनवासी” शब्द स्वाभाविक पणेच येणार.पण विधान परिषद मध्ये दिलेले उत्तर चातुर्यपूर्वक दिशाभूल करणारे आहे.असे आम्हास वाटते. (मंत्री महोदय आमचे चांगले स्नेही आहेत.मी त्यांना१९९५ पासून ओळखतो.ते एक चांगले कार्यकर्ते, नेते आहेत)आणि तमाम आदिवासींचा “वनवासी” शब्द उच्चारणाला,वापराला सक्त विरोध आहे.त्यामुळेच आमदार आमश्या पाडवी यांनी त्या शब्दाला विरोध केला.प्रश्न एवढाच आहे आमदार आमश्या पाडवीला ते प्रथमच विधीमंडळात आले म्हणून बरोबर मुद्दा मांडता आला नाही.पण त्यांना काय सांगायचे आहे तो संदेश मात्र पोहचला.
 
दुःख याचे की,एक नवखा विधान परिषदेचा आमदार बोलत असताना अन्य आमदार त्यांना बोलण्यापासून परावृत्त करत होते, रोखत होते असे क्लिप मधील संवादातून दिसून येते.
 
आदिवासीना बोलू द्या!
त्यांचा आवाज बंद करू नका!
तुम्हीच म्हणता एका आदिवासी महिलेला सर्वोच्च पदी विराजमान केले.
तर,आता तरी बोलू द्या….
 
 
प्रभू राजगडकर.,नागपूर
२५|८|२०२२