कोलाम आदिवासींनी विदर्भ कोंकण बँकेला ठोकला कुलूप!
श्रमिक एल्गार, बिरसा संघटना, ऑफ्रोट संघटनांचे संयुक्त नेतृत्व
एका बाजूला मुख्यमंत्री शेतकऱ्यांना पत्र लिहून सरकार २४ तास शेतकऱ्यांसाठी तत्पर आहे असे सांगत असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम तालुका जिवती येथील आदिवासी शेतकरी मात्र पीक कर्जासाठी आंदोलन करत आहे. अठरा विश्व दारिद्र्यात जगणारे आदीम कोलाम आदिवासींना अमृत काळात हककासाठी आंदोलन करावा लागत आहे, यापेक्षा दुर्दैव दूसरा काय? आता प्रश्र्न आहे की मुख्य मंत्री स्वतःचा पत्रानुसार आंदोलनाचे दखल घेत न्याय देतील की हा पत्र निव्वळ एक ‘जुमला ‘ होता?
तिन महिन्यापासून बँकेचे उंबरठे झिजवून सुद्धा हाती नाही पीक कर्जाची रक्कम जिवती तालुक्यातील काकबन, भुरियेसापूर, टाटाकोहाड, सिंगरपठार, शेडवाही येथील वनहक्क पट्टे धारक जिवती येथील विदर्भ कोंकण ग्रामिण बँकेत तीन महिन्यापासून उंबरठे झिजवीत आहेत.मात्र बँकेचे व्यवस्थाक दिडवलकर यांना काही देने घेणे नसल्याचे चित्र आहे.
तीन महिन्यापासून बँकेचे उंबरठे झिजवीत असून यात आमचे प्रचंड पैसे गेले असून बँकेला स्टॅम्पपेपर, नादेय प्रमाणपत्र, सर्व कागदपत्रे देऊन सुद्धा पीक कर्ज दिल्या जात नाही यामुळे या बँकेने आमची आर्थिक लूट केली असल्याचे पर्वताबाई कांशीराम चाहकाटी या वनहक्क धारक महिलेने आपली व्यथा मांडली.
यावेळी बँकेच्या गेट ला कुलूप लावून कुलूप बंद आंदोलन करण्यात आला यामुळे व्यावस्थापकांनी पोलिसांना बोलविले.
बँकेत वनहक्क धारकांना पिक कर्जाच्या मागणीसाठी अफ्रोट संघटनेचे डॉ. मधुकर कोटनाके, श्रमिक एल्गारचे घनश्याम मेश्राम, बिरसा क्रांती दलाचे संतोष कुलमेथे यांच्या नेतृत्वात वनहक्क धारकांना घेऊन ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले असून पीक कर्ज मिळेपर्यंत बँकेतून जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने बँकेच्या व्यवस्थापकाची तारांबळ उडाली व्यवस्थापकांनी चंद्रपूर येथील त्यांचे अधिकारी खाडे यांना फोन करून प्रकरणाचे गांभीर्य कळविले आहे खाडे यांनी चंद्रपूर येथून जिवतीला येऊन प्रश्न सोडविण्याची तयारी दर्शविली असून पिक पिक कर्ज न दिल्यास बँकेसमोर पेंडाल टाकून बेमुदत आंदोलन सुरू करणार असल्याची भूमिका डॉ. मधुकर कोटनाके यांनी घेतली आहे.