चंद्रपूर लोकसभानिवडणूकीचे पडघम वाजू लागले
लोकसभा निवडणूकीस तसे दोन वर्षे वेळ आहे, पण आतापासून 2024 च्या लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले. उत्तर भारतीय निवासी, चंद्रपूर लोकसभा प्रभारी हरीदिपसिंग पुरी यांची प्रभारी पदी नियुक्ती झाल्यानंतर, निवडणूकीची चर्चा रंगू लागली आहे.
22 ते 24 सप्टेंबर या दरम्यान पुरी यांचा दौरा निश्चित झाला आहे. लोकसभा निवडणूकीस 18 महिणे शिल्लक आहे. या अठरा महिण्यात 6 वेळा मुक्कामी दौरा ते करणार आहे. मागील खेपेस भाजपा उमेदवार हरलेल्या जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी आतापासून तयारीस लागले आहे. पुरीचा दौरा, त्याच तयारीचा भाग आहे.
2024 ची लोकसभा भाजपा ताकदीने लढणार हे निश्चित असले तरी, या निवडणूकीच्या रिंगणात कोणता शिलेदार असणार? भाऊ कि भैय्या? याचे उत्तर येणारा काळ देणार असले तरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे यांचे दौर्यानंतर चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
भैय्याच (हंसराज अहिर) लोकसभा रिंगणात राहतील अशी शक्यता असली तरी, अलिकडे भाऊंचे राजुरा प्रेम वाढल्यांचे दिसून येत असून, मंत्री बनल्यानंतर, आपल्याच मतदार संघातील मूलकडे आधी येण्याऐवजी, राजुरात त्यांची झालेली लाडूतुला, दणक्यातील स्वागत, मुर्ती विमानतळासाठी तातडीचा पाठपुरावा म्हणजे भाऊचे दिल्लीकडे लक्ष लागले आहे काय? अशी एक चर्चा भाजपाच्याच अंतर्गत वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे भाऊ भैय्याच्या चर्चेत, बाळू भाऊंचेही नावांची भाजपात एंन्ट्री होत आहे. मध्यंतरीच्या काळात खासदार धानोरकर हे भाजपात जाणार असल्यांची जोरदार चर्चा जिल्ह्यात होती. चर्चा एवढी रंगली की, ‘भाजपात जाणार नाही’ असा खुलासा बाळूभाऊना करावा लागला. मात्र राज्यातील एकमेव काॅंग्रेसचे खासदार असतांनाही, सत्तारूढ भाजपाच्या विरोधात खासदार धानोरकर हे गुळमिळीत बोलतात, हे मात्र खरे!
आता राज्यात भाजपा आणि शिंदे गटाची युती झाल्यानंतर, आगामी विधानसभा आणि लोकसभा शिंदे गटासोबत भाजपा लढणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर हे थेट भाजपात जाण्याऐवजी शिंदे गटात जावून, चंद्रपूर लोकसभा शिंदे गटाचे पदरात पाडून घेतील आणि 2024 साठी भाजपा -शिवसेना (शिंदे गट) अषीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मराठीत एक म्हण आहे, ‘मले न तुले, घाल कुत्र्याले’ अशी अवस्था तर चंद्रपूरात होणार नाही ना?
94422910167