आपल्या नावांने अख्या जिल्हयात वेगळी ओळख निर्माण करणारे, चंद्रपूरचे प्रसिध्द आणि ऐतिहासिक बंगाली कॅम्पमध्ये वाढणारी दारू दुकानाची संख्या बघता, यापुढे हे बंगाली कॅंम्प ‘दारू कॅंम्प’ म्हणून ओळखले जातील काय? अशी भिती आता या चौकातील नागरीक करीत आहे.
भारत बांग्लादेशाचे फाळणीनंतर आणि स्वतंत्र बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर, भारत सरकारने  बंगाली शरनार्थीना चंद्रपूर गडचिरोली जिल्हयातील वेगवेगळ्या भागात पुर्नवसीत केले.  बंगाली कॅंम्प हा त्यापैकीच एक परिसर.
याच चौकातून छत्तीसगड, मध्यप्रदेशासह गडचिरोली, ब्रम्हपुरी, मूल सिंदेवाही मार्गावरून चंद्रपूर जिल्हयात प्रवेश करीत असतात. तेलंगाना मार्गही याच चौकातून जात असतो.  भाजीपाला आणि मटन मच्छीचे ठोक व्यापारही याच चौकाचे परिसरातून चालत असल्यांने हा चौक नेहमीच गजबजलेला असतो. याच चौकात आणि चौकाचे 100 मीटर परिसरात 6 ते 7 बियरशाॅपी, बियर बार, वाईन शाॅप, देशी दारूचे दुकाने असून, आणखी काही दुकाने प्रस्तावित आहेत.  ही दुकाने सुरू झाल्यास, हा चौक म्हणजे, दारूची राजधानी बनेल काय? अशी भिती आता व्यक्त केल्या जात आहे.
चौकात वाढत्या दारू दुकानामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्यांची भिती आहे, तर अपघाताची शक्यताही वर्तविली जात आहे.
चंद्रपूर जिल्हयात दारूबंदीनंतर, राज्याचे माजी पालकमंत्री तथा मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्हयात पुन्हा दारूची दुकान सुरू करवून दिली.  यामुळे आता ठिक-ठिकाणी दारूची दुकान सुरू होत असल्यांने, तक्रारीची संख्याही वाढत आहे.
दारुबंदीचे प्रणेते सुधीर भाऊ मुनगंटीवार पुन्हा मंत्री बनल्याने जिल्ह्यातील दारू समस्या मार्गी लागेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
– विजय सिद्धावार
मूल, ९७६७९९५७४८