welcome to The Vidarbha Gazette


माजरी गावातील ताराबाई बहूद्देशीय मंडळ. या मंडळाच्या अध्यक्षा मंदा पाडूरंग निब्रड व सचिव वंदना अनिल सातपुते यांनी आज महिला शिष्टमंडळासहित जिल्हाधिकारी चंद्रपूर यांची भेट घेतली. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात महापूरामुळे माजरी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून गावकरी महिलांना मुलाबाळांसाठी चार दिवस माजरी रेल्वे स्टेशनवर काढावे लागले. माजरी येथील गावकऱ्यांचे भयानक नुकसान झाले असून यासाठी सर्वस्वी जबाबदारी माजरी एरिया येथील नागलून खुल्या खाणीचे मातीचे उंच ढिगारे आहेत. सदर ढिगारे शिर्णा नदी पात्रालगत असल्यामुळे नदीपात्रातील पाणी माजरी गावाकडे जास्त प्रवाहित होऊन महापूराची परिस्थिती निर्माण झाली आहे. मातीचे ढिगारे न हटविल्यास भविष्यात पुन्हा पूर येणार आणि जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माजरी गावात आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा नेत्यांनी भेट दिलेले नाही किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही.

वेकोली मार्फत एकतर मातीचे ढिगारे हटविण्यात यावे किंवा गावाचा पुनर्वसन करण्यात यावा अशी मागणी उपस्थित महिलांनी उपजिल्हाधिकारी मेश्राम यांच्याकडे केली. यावेळेस आर.डी.सी. मेश्राम ‘यांनी तात्काळ पाहणीसाठी तहसीलदार भद्रावती यांना निर्देश देतो’ असे आश्वासन देतो. मागणी पूर्ण न झाल्यास वेकोली कार्यालय समोर अन्न त्याग आंदोलनाचा इशारा दिला.

” height=”266″ src=”https://img1.blogblog.com/img/video_object.png” width=”320″ style=”cursor: move; background-color: rgb(178, 178, 178); background-image: url(“https://i.ytimg.com/vi/RZyP_P7O5wg/0.jpg”);”>

Women of Majri village describe their plight

 

 

Search

About

The Vidarbha Gazette: An Introduction

Digital media has democratized the production and consumption of media to an extent that would have been unimaginable in the past. Media production is no longer at the mercy of a few family-owned businesses and corporate houses. Roughly speaking, every person who has an android phone in hand and a few bucks to recharge their data pack have the potential to produce news and not just consume it.