Shaharateel Dukre (Swines of the City) and Bokyanchi Sabha (The Meeting of Tomcats) are two recent political poems of Prabhu Rajgadkar.  Both poems use animal imagery to directly comment on contemporary politics and the situation of the common people. In Shahrateel Dukre the poet narrates his meeting with a group of swines who roam city lanes in the dead of the night. They taunt the poet saying that there are swines in the shape of humans who remain silent when they should speak out. The poet, unable to find a proper answer, remains silent and returns home. In Bokyateel Sabhai menacing tomcats hold a meeting in which they compete with each other, howling out lies. The leader out to become a world leader announces the arrival of a cheetah in the country. Two macabre creatures dance as they grow richer while ordinary people are distracted by the cheetah. The poems are barely disguised commentary on actual events and people and the use of animal imagery serves two main purposes – firstly, human sentiments are powerfully expressed through animals  and secondly, the images leave readers with a discomfort that politics around us is descending to the level of crass animal instincts.

I

शहरातील डुकरे

……………………….
काल रात्री शहरात फिरत असताना
डुकरांचा कळप
माणसं झोपल्यानंतर
निवांत !
 सहकुटुंब फिरत होते ते.
उंच गलेलठ्ठ डुकर
पिलांना घेऊन
निवांत पणे हुंदडत होते
तोंड मारत फिरत .
वयस्क डुक्कर थांबल
माझे कडे पाहून म्हणालं  ,
नवा दिसतोय
या शहरात
असा रात्रीचा फिरू नकोस .
मी म्हणालो,
ये डुकरा मी येथे नवा नाही
तसा जुनाच आहे
पण अलिकडे कधी कधीच येत असतो.
डुक्कर म्हणालं,
तर तुला या शहराची ओळख आहे.
ओळख !
चांगलीच !
अगदी जंगली डुकराची सुध्दा.
डुक्कर म्हणालं-
मग सांग
माणसात आणि डुकरात फरक काय ?
मी चपापलो.
उत्तर द्याव तरी फसलो
नाही द्याव तरी फसलो.
शांत राहीलो.
तस डुक्कर म्हणालं:
माणसाचा हाच स्वभाव
जेव्हा बोलल पाहिजे
तेव्हा धरतात मौन.
सध्या मौनी बाबाच राज्य आहे का रे !
मी नुसताच खो खो करत चौकाकडे
डुकरा सारखा पळत सुटलो.
तस डुकर जोराने ओरडले
तिकडे जाऊ नको
खो खो हसू ही नको,
तूला पकडून नेतील
कदाचीत नक्षलवादी,
देशविरोधी, अतिरेकी
आणि काय काय
ठरवतील.
युएपीए की काय लावतील
स्टेन स्वामी सारख मर्डर करतील !
तुमच्या माणसातही आमच्या सारखे
जाड कातडीचे ‘डुक्कर माणसं ‘
असल्याचे ऐकतो ,पाहतो आहे.
ती ही आमच्या सारखी कुठेही तोंड मारतात म्हणे!
डुकराचे हे चिंतन ऐकून
चिंतामग्न होऊन घराकडे निघून आलो.
II

बोक्यांची सभा

………………………..
एक मांजर बोका दाढीवाला
आला
बसला खुर्चीवर .
दुसरा  मांजर बोका
आला
पण खुरटी दाढीवाला .
पहिला बोका  कधी कधी
वाढवतो दाढी
कोण्या एका
थोर कवी सारखी
पण कुठे तो कवी !
कुठे हा बोका !
दुसरा तर एकदा
कसल्यातरी प्रकरणात
तडीपार होता.
इतर बोके आणि
काही बोकीनी
सुध्दा आहे.
पण ते शेपुट गुंडाळून
गुरगुरण्याची वाट पाहत
कोप-यात बसून असतात.
बोक्यांची सभा झाली सुरू
सभाध्यक्ष असलेल्या बोक्याने
सोडले फर्मान, “फेका किती फेकायचे ते!”
एक क्वीन झाली उभी.
 म्हणाली,
“हमारा नगर राज्य अभी अभी कल परसो ही आजाद हुआ!”
मग सुरू झाली स्पर्धा फेकाफेकीची .
सभाध्यक्षानी डोळे काढताच
उर्वरीत भाषण थांबली.
सभाध्यक्ष असलेल्या बोक्याने-
“आज पर्यंत, कालपरवापर्यंत
मी सत्तेत येईपर्यंत या “नगर राज्यात” काहीच झाले नाही..
आता आम्हाला विश्वगुरु होणे आहे….
सबको (अ)- न्याय, सबको (आ)-राम ….
किसान को (बे)-भाव…
चिता आया अब चिंता की कोई बात नही…!”
टाळ्या वाजवल्या
बोके अन बोकीनींनी.
सभा पांगली .
पण,
गरीब हडकुळे मांजरी, मांजर
लम्पीग्रस्त गौमाता,आदिप्राणी
आधारभूत नजरेने पाहत चालू लागले.
तसे बाजूला उभे राहून दोन गलेलठ्ठ प्राणी
उन्मत्त होत नाचू लागले.
एक होता- अबानी
दुसरा होता -अडाणी.
दोघही म्हणाले-
”चिता आला बर झाल
 लोक चित्यात आपण पैशात”
प्रभू  राजगडकर, नागपूर