The following two poems in Marathi are written by Prabhu Rajgadkar, who retired as Additional C.E.O, Zilla Parishad. Even as an officer he was known to be sensitive to rural and tribal issues which were central to his poetry and writings. He is a well-known intellectual voice of the Adivasis. The two poems here are a commentary on the present regime’s repression of freedom of expression.
प्रभू राजगडकर यांच्या दोन कविता
…………………………………….
१.
ते धाड धाड इमारतीच्या पाय-या,चढलेत
दाराला जोरजोराने थापाडले
तरी काँल बेल होती बर .
मी दार उघडले
तसे रागातच म्हणाले,
‘ते तुम्हीच का,!’
मी म्हणालो …हो.
“अखलाख ,जूनैद
जामीया मीलीया,जेएनयू
शाहीनबाग घटनाबाबत
बोलताय,लिहीताय सुध्दा.
अन आताही
हाथरसवर लिहिता,कविता करताय
योगी पुरुषावर टीका करता
प्रधान सेवकाला मौनी म्हणता.
हा नवा भारत आहे
आत्मनिर्भर भारत
ठावूक नाही का?”
एकादमात विचारले त्यांनी.
एवढे बोलून ‘राजद्रोही’ ठरवून
घेऊन गेले मला
मी आता
गजाआड ,
लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभ्यास करतोय.
२.
कवीने साधीशीच कविता लिहीली
जंगलात वास्तव्याने असणा-या लोकांच्या समस्याविषयी
राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणारी.
प्रश्न नेहमीचेच होते
जल-जंगल-जमिनीविषयी
त्याला जोडूनच नव्या कार्पोरेटसच्या
घुसखोरी करणा-या वाकड्या नजरेबाबत
त्यांना ‘वनवासी’ ठरवण्याच्या कट कारस्थानाबाबत
पाचवी अनुसूची,वनहक्क-पेसा बाबत
शिक्षण-आरोग्या बाबत
त्यांच्या साठी लढणा-या सोनी सोरी,सुधाबाबत
पथ्थलगडी,सलवा जुडूम बाबतही काही प्रश्न होते
प्रश्नांची यादी बरीच होती
एक प्रश्न डा.काफीलखान बाबतही होता.
राज्यकर्त्या पैकी कोणीतरी
ही कविता वाचली असावी
हा कवी कोण?
फर्मान निघाले
कवीला काढले शोधून
कवीची झाली छानबीन.
कवीजवळ लेनिनपासून नारायण सुर्वे-नामदेव ढसाळापर्यंत
कवितांच्या पुस्तकाशिवाय काहीच नाही मिळाले.
तरीही राज्यकर्त्यांच्या शोधपथकाने ब्यागेतून दोन शिक्के काढले
आणि
कवीच्या दोन्ही हातावर उमटवले
एक-‘देशद्रोही’
दुसरा-‘नक्षलवादी’
तरीही कवी आताही कविताच करतो
आणि व्यवस्थेला प्रश्न विचारतो.
प्रभू राजगडकर
१२आक्टो २०२०
नागपूर
9422191202
२.