श्रमिक एल्गार आणि पथ विक्रेता कायदा 2014 ची अमंलबजावणी
“पन्नास हजाराचा कर्ज घेवून दोनच महिणे झाले होते, याच कर्जातून एक ठेला विकत घेतला, त्यात स्टेशनरीचा धंदा सुरू केला. थोडे—थोडे पैसे जमवून, घेतलेले कर्ज फेडता येईल, अशी आशा असतांनाच, नगर परिषदेने अतिक्रमण हटाव म्हणत माझा ठेला हटविण्यांची नोटीस दिली. नोटीस वाचताच, कसे जगायचे? कर्ज कसे फेड करायच? असे अनेक प्रश्न माझे मनात आले. मात्र आमच्या मदतीला श्रमिक एल्गार धावून आली, अॅड. पारोमिता गोस्वामी ताईने आमची मदत केली, तेव्हापासून आमचे व्यवसाय चांगले सुरू आहे. आता आम्ही नगर विक्रेता समितीत निवडूण आलोत, आम्हाला सन्मान मिळाला, आमचे व्यवसाय ताईने वाचविले, आता आम्ही इतरांची मदत करणार” असे आपल्या भाषणातून नंदीनी आडपवार यांनी आपले पानावलेले डोळे पुसत आपले मनोगत व्यक्त केले.
पथविक्रेता कायदा 2014 ची प्रभावी अमंलबजावणी करण्यात यावी यासाठी श्रमिक एल्गारने चंद्रपूर, वर्धा जिल्हयात अनेक आंदोलने, मोर्चे काढले होते. या कायदयाप्रमाणे पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण, नगर विक्रेता समिती करण्यांचीही मागणी केली होती. नगर परिषदेने सर्वेक्षण केल्यांतर, पथविक्रेत्यातून 8 सदस्यांची निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, दिव्यांग, अल्पसंख्याक गट व महिलांकरीता राखीव असे एकूण 8 सदस्यांची निवडणूक जाहीर केली. या निवडणूकीत श्रमिक एल्गारचे सभासद वरोरा, मूल, बल्हारपूर या नगर परिषदेत अविरोध निवडूण आले.
दिनांक 4 आॅगष्ट 2024 रोजी श्रमिक एल्गारचे वतीने शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येथे सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमास श्रमिक एल्गारचे अध्यक्ष प्रविण चिचघरे, रासपचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार, पत्रकार राजू बिट्टूरवार आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात, अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी, आपल्याला हक्क मिळाले, आपण पदावर आलो, आता या पदाचा सन्मान करीत, गरीबांना मदत केलो पाहीजे, चांगले कार्य आपल्या हातून घडले पाहीजे असे मार्गदर्शन केले.
यावेळी संजय कन्नावार, राजू बिट्टूरवार, प्रविण चिचघरे, रेवती इंगोले, अमीत राउत, वासीमभाई, संजय नरूले यांनी मनोगत व्यक्त केले.
निर्वाचित सदस्यांचा अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे निमीत्ताने, जिल्हयातील पथविक्रेतांची संघटना मजबूत करून, या कायद्यांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन विजय सिध्दावार यांनी तर आभार प्रदर्शन नंदीनी आडपवार यांनी केले.
* विजय सिद्धावार, 9422910167